पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपट अभिनेत्रीची दुनिया

इमेज
  अभिनेत्री सीमा देव चा इंग्रजीचा क्लास ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव गिरगावहून माहीमला राहायला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट. चित्रपटात आहोत म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला यायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी शिकवणी लावायची ठरवली. एक ख्रिश्चन मुलगी त्यांना शिकवण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठीचा  सराव  करून देण्यासाठी  त्यांच्या घरी येऊ लागली. परंतु शूटिंगच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसे. ती मुलगी दररोज येऊन जात असे . परंतु झाले मात्र असे सीमा देव याना इंग्रजीचा सराव  देणे राहिले बाजूला ती मुलगीच छानपैकी मराठीचा सराव करून गेली.   झीनत अमानची ' मोलकरीण ' झीनत अमानला एकदा तिच्या घरी कपडे धुण्यासाठी एका मोलकरीणीची गरज होती. ही बातमी ऐकून एक जण तिच्याकडे आली.  झीनतने तिची इंटरव्हियू घ्यायला सुरुवात केली. तिला प्रश्न विचारला , यापूर्वी तू कोठे नोकरी करत होतीस ? ती म्हणाली ...राखी गुलजार कडे झीनत म्हणाली ,' मग ती नोकरी सोडून माझ्याकडे नोकरी का करावीशी वाटतेय तुला ? राखीपेक्षा मी अधिक लोकप्रिय आहे म्हणून का ? नाही मॅडम , मग माझ्याकडे नोकरी का...

प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षानंतर वर्ग भरला.

इमेज
  ४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला  पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,... आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठव...

दरडग्रस्त साखर सुतारवाडी येथे मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडले दागीने

इमेज
 दरडग्रस्त साखर सुतारवाडी येथे मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडले दागीने २२ जूलै रोजी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे भुसख्खलन होत दरड कोसळली होती. या दर्घटनेत साखर सुतारवाडीतील २३ घरे जोत्यासह वाहुन गेली होती तर पाच व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला होता. सहा महिने उलटलेल्या या काळरात्रीत अनेकांच्या संसाराची वाताहत होताना पुंजी पुंजी जमवून साठवलेला दागदागिन्यांसह पैसा अडका वाहून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सामाजिक संस्था, सर्व पक्षीय नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या तातडीच्या मदतीने महाड-चिपळूण यांच्यासह हे गावसुद्धा सावरले, परंतू पै पै जमा करून भविष्यात उपयोगात येईल या आशेने पदरच्या हरवलेल्या दागदागीण्यांचे दुःख आपत्तीग्रस्त विसरु शकत नव्हते. पोलादपूर तालुक्यातील शिवसेनेचे युवानेतृत्व अनिल मालुसरे यांनी साखर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आमदार भरतशेठ गोगावले, रायगड जि प उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहीरे, ग्रामपंचायत सरपंच पांडूरंग सुतार यांच्या माध्यमातून तहसीलदार पोलादपूर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मातीचा ढीगारा उपसण्याच्या कामास...

स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज

इमेज
  स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज अ कबराच्या दरबारातील तानसेन केवळ माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यानाही आपल्या गायनाने मुग्ध करीत असे , विझलेले दिवे प्रकाशित करणे आणि मेघमल्हार राग गाऊन वर्षाव घडवून आणणे आदी किमया देखील त्याने घडविल्याच्या दंतकथा त्यांच्या गायनातील कर्तबगारीपुढे जोडल्या जातात. या शतकाच्या प्रारंभी कलकत्त्याजवळील एका बातमीने जगभर  उडवून दिली होती. एका मंदिराजवळ एक खजुरीचे झाड होते व ते ६० अंशाच्या कोनात कललेले होते. या मंदिरात सायंकाळी रितीनुसार घंटानाद केला जात असे. प्रार्थनेच्या वेळी होणाऱ्या या घंटानादास प्रारंभ होताच हे झाड वाकून जात असे. जणू काही प्रार्थनेसाठीच ते मस्तक झुकवीत असे. सकाळ होताच ते झाड पुन्हा आपले मस्तक उंचावून घेत असे. झाडाचा हा भक्तिभाव पाहून परिसरातील माणसे अवाक झाली. या झाडाची पूजाही होऊ  होऊ लागली. भाविकांना असं वाटू लागलं होत की , या झाडाची पूजा केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होईल. पण असा काही भाग नव्हता. हा केवळ संगीताचाच परिणाम होता. जेव्हा जेव्हा आपण  पंडित भीमसेन जोशींचा भटियार ऐकतो. पं. जसराजचा भैरव ऐकतो किंवा...