पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रभू श्रीरामचंद्रांच्या १०८ रामायणांची माहिती करून घ्या

इमेज
प्रभू श्रीरामचंद्रांच्या १०८ रामायणांची माहिती करून घ्या  हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आपण उगवतीला देव मानतो, मावळतीला हात जोडतो, सूर्याला नैवेद्य दाखवतो, चंद्राला ओवाळतो, दाही दिशांना अर्ध्य देतो, सागराची पूजा करतो, विहिरीला हळदकुंकू वाहतो, धरित्रीची पूजा बांधतो....हे सर्व करण्यामागे ज्या देवानं आकाशात अनंत तारे निर्माण केले,चंद्र-सूर्याचं दर्शन घडवले, अथांग सागर निर्माण केला, नादिनाले वाहावले, सुवासिक फुलं फुलविली, रुचकर फळं पिकवली, ऊन, वारा, पाऊस यांचा वर्षाव केला, जिवाभावाची नाती जोडायला शिकवलं, आणि अन्नासह वस्त्र, निवाऱ्याची सोय केली, देवाचा आपल्यावर, आपल्या कुळाचारावर अनंत काळ वरदहस्त असावा, देवानं आपल्यावर प्रसन्न असावं. त्या देवाबद्दलचा नम्रभाव प्रकट करण्यासाठी आपण नित्य नियमित पूजा-अर्चाना करण्यासाठी त्याचे देवालय उभारतो, त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करतो ! आज आपण आपल्या हिंदू धर्माची अस्मिता म्हणून प्रभू श्रीरामाच्या चरणी भक्तीभाव म्हणून "रामनवमी " साजरी करीत आहोत. राममंदिर हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही, असे असताना धर्मभावना चेतवण्यासाठी अफूची गोळी देऊन देश...

'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान'स्पर्धा

इमेज
  मराठी भाषा दिवसानिमित्त  स्पर्धा 'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान'  लेख स्पर्धा या विषयावर खुली लेख स्पर्धा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य ' माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान ' या विषयावर १२०० शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती 'मराठी' च म्हणून मराठी माणसाला आवडते.  बोलीभाषेतील साहित्...