पोस्ट्स

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

इमेज
  कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे झालेले अकाली निधन त्यावेळी महाड - पोलादपूरकरांच्या मनाला चटका लावणारे होते.  बातमी घेऊन येणारी  त्या दिवसाची  स काळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक दुःख देणारी होती. माणिकराव यांच्यावर मुंबईत कोरोना आजारात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. दुर्दैवाने आपल्यातला काळाने एक मोठी क्षमता असलेले नेता आपल्यातून हिरावून नेला होता.   माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला होता. सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी अभ्यासू वृत्तीने तळमळीने झटणारा लोकनेता होता तो. माणिकरावांचे आणि माझे व्यक्तिगत पातळीवर   संबंध अतिशय जवळचे मित्रत्वाचे होते. माणिकरावांची आणि माझी सामाजिक-ऐत्याहासिक प्रश्नावर अधूनमधून अनेकवेळा चर्चा व्हायची, एकमेकांची फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिन...

शाहीर आत्माराम पाटील

इमेज
शाहीर आत्माराम पाटील आज शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. (९ नोव्हेंबर १९२४ ते १० नोव्हेंबर २०१०) काल त्यांच्या जन्मगावी एका कार्यक्रमात आत्मारायण या ग्रंथाचे प्रकाशन केले, त्या ग्रंथातील हा लेख.  शाहीर चंदू भरडकर आज हयात नाहीत, परंतु ३० वर्षांपूर्वी ते मला लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या समोरील येथे एका चाळीत घेऊन गेले होते. शाहीर आत्माराम पाटील यांच्याशी माझी ती पहिली ओळख. सनमिल कंपाऊंडमध्ये मी नोकरीला असल्याने घरी येताना अनेकवेळा शाहिरांची भेट व्हायची आणि गप्पा होत असत. ते ज्या ठिकाणी राहत होते त्याठिकाणी म्युझिक रेकॉर्डिंगचे काम व अलीकडे टोलेजंग इमारत उभी राहते आहे, मी २ वर्षांपूर्वी या ठिकाणी गेलो होतो तेव्हा शाहिरांची प्रकर्षाने आठवण झाली होती. आज राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई यांनी शाहिरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने यासंबंधाने लिहावे असा आग्रह केला.  १८९० ते १९२० हा तमाशा कलेचा अत्यंत भरभराटीचा आणि उत्कर्षाचा कालखंड होय. याच काळात अनेक दिग्गज शाहीर उदयाला आले. शाहीर पट्ठे बापूराव, शाहीर अर्जुना वाघोलीकर, शाहीर दगडू साळी तांबे शिरोलीकर, हरिभा...

वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे

इमेज
  वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे  वर्तमानपत्रातील वृत्तपत्र लेखन हे कोहीनुरच्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आणि तलवारी पेक्षा धारधार मानले   जाते. जनसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे आणि निस्वार्थीपणे मांडताना वृत्तपत्र लेखक नियमितपणे लेखन करीत असतो. जणू तो जगाच्या तिसऱ्या डोळ्याची भुमिका बजावीत असतो. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित हे वयाच्या पंच्याहत्तरीतही सातत्याने असे लेखन करीत आहेत. या माध्यमातून अभ्यासपूर्वक ते समाज घडविण्याचे व राष्ट्रहीत जपण्याचे मोठे काम करीत आहेत, ते करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिल्या. ठाणे आणि चिपळूण येथील ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मालुसरे बोलत होते. पंडितांच्या लेखणीत एवढी धार असते की तलवारीची धार त्यासमोर फिक्की पडतांना दिसून येईल. कारण संपूर्ण समाजाच्या नैतिकतेची जबाबदारी वृत्तपत्र लेखकांच्या खांद्यावर असते व ती लेखणीतू...

४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४

इमेज
४९ वी  राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४ दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ...... १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीचे यंदा अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरे करीत असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने  दरवर्षीप्रमाणे यंदाही ४९ वी  राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे , या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशात अमेरिका लॉस एंजिइल्स येथे पोहोचणार आहे.  या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान ,  अमेरिकेतील लॉस एंजिइल्स येथील " मराठी     संस्कृती. com , - MCF Foundation - मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल ही संस्था सहभागी होत आहे.   या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात.  सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक , सा...

महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप

इमेज
  राजसत्तेतल्या कारभारणी ..... महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा :  स्नेहल  माणिकराव  जगताप स्नेहल   माणिकराव   जगताप  ... महाडचे एक कल्पक नेतृत्व , धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व , आणि माणिकराव   जगताप   तथा आबाची राजकारणातली ' सावली ; म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या.   याशिवाय अल्पावधीतच महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या , कार्यकुशल आणि प्रचंड मेहनती वृत्ती असणाऱ्या राजकारणातील कारभारीण.... महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी  वीरेश्वर देवस्थानच्या    गाडीतळावर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड किल्ला निवडल्यानंतर तर मराठ्यांच्या इतिहासात महाडचे भौगोलिक महत्व अधिक वाढले हा इतिहास आहे. त्यानंतर तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेंब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहराला ऐत्याहासिक , सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास वारसा लाभत गेला त्यात अधिकाधिक भर पडत गेली.  ...

गुरुवर्य गणेश केळकर :वृत्तपत्र लेखक व कार्यकर्त्यांचा वाटाडया

इमेज
गुरुवर्य गणेश केळकर : वृत्तपत्र लेखक व  कार्यकर्त्यांचा वाटाडया   ............................................. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक स्व . गणेश केळकर यांचा आज ७१ वा जन्मदिवस ! यनिमित्ताने त्यांच्या विविधांगी कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा ...  .............................................   आता या घटनेला २० वर्षे उलटून गेली आहेत . ८ मे २००४ चा शनिवार , नेहमीप्रमाणे आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे पदाधिकारी आणि नियमित हजेरी लावणारे   सभासद दादर पूर्वेकडील शिंदेवाडीच्या कार्यालयात येण्यासाठी आपापल्या कार्यालयातून किंवा घरून शिरस्त्याप्रमाणे निघालो होतो . गणेश केळकरही निघाले होते . संध्याकाळी ६ वा आम्ही कार्यालय उघडायचो .... आणि बरोबर त्याच वेळी बातमी आली .. गणेश केळकर यांचे हार्ट अटॅकने निधन झाले . त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून लोअर परेल स्टेशनवरून ते परत घरी गेले ते संघात परत न येण्यासाठी . कोणत्याही आजाराची पूर्वसूचना ...