शाहीर आत्माराम पाटील
शाहीर आत्माराम पाटील आज शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. (९ नोव्हेंबर १९२४ ते १० नोव्हेंबर २०१०) काल त्यांच्या जन्मगावी एका कार्यक्रमात आत्मारायण या ग्रंथाचे प्रकाशन केले, त्या ग्रंथातील हा लेख. शाहीर चंदू भरडकर आज हयात नाहीत, परंतु ३० वर्षांपूर्वी ते मला लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या समोरील येथे एका चाळीत घेऊन गेले होते. शाहीर आत्माराम पाटील यांच्याशी माझी ती पहिली ओळख. सनमिल कंपाऊंडमध्ये मी नोकरीला असल्याने घरी येताना अनेकवेळा शाहिरांची भेट व्हायची आणि गप्पा होत असत. ते ज्या ठिकाणी राहत होते त्याठिकाणी म्युझिक रेकॉर्डिंगचे काम व अलीकडे टोलेजंग इमारत उभी राहते आहे, मी २ वर्षांपूर्वी या ठिकाणी गेलो होतो तेव्हा शाहिरांची प्रकर्षाने आठवण झाली होती. आज राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई यांनी शाहिरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने यासंबंधाने लिहावे असा आग्रह केला. १८९० ते १९२० हा तमाशा कलेचा अत्यंत भरभराटीचा आणि उत्कर्षाचा कालखंड होय. याच काळात अनेक दिग्गज शाहीर उदयाला आले. शाहीर पट्ठे बापूराव, शाहीर अर्जुना वाघोलीकर, शाहीर दगडू साळी तांबे शिरोलीकर, हरिभा...