फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे - वीरमाता अनुराधा गोरे फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न मुंबई (रवींद्र मालुसरे) :- युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे . देशसेवा करण्यासाठी विविध सेवा मार्ग खुले आहेत . त्यासाठी जिद्दीने अभ्यास करा , आत्मविश्वासाने व पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षण सामोरे जा . स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून आपण विविध हक्कांची मागणी करतो . आपल्याला सुरक्षितता हवी असते मात्र देशाच्या सुरक्षिततेचा विचार आपण विशेषतः युवा पिढी करणार आहे की नाही . देशाचे भविष्य घडविणे तुमच्या हाती आहे असे आवाहन शहिद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले . शेकडो युवा - युवतींना प्रेरित करताना अनेक प्रासंगिक उदाहरणे ओघवत्या शब्दात देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना दादर येथे मार्गदर्शन केले . महाड येथील फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने पंचक्रो...