वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी माणूस घडवणारा शिल्पकार
वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी माणूस घडवणारा शिल्पकार माणूस बदलवण्याच्या प्रक्रियेत प्रबोधनाचा वाटा फार मोलाचा असतो, गेल्या हजारो वर्षांपासून वारकरी संप्रदायातील लाखो प्रवचनकार- किर्तनकारांनी आणि ज्ञानदान देणाऱ्या गुरुजनांनी प्रबोधन करीत माणसांना सन्मार्गावर आणण्याचे काम केले आहे. फरक इतकाच असतो की शिल्पकार आपल्या डोळ्यासमोर एखादे शिल्प घडवतो आणि शाळा शिक्षकाच्या माध्यमातून तर वारकरी सत्संगाच्या माध्यमातून आपल्यातला माणूस नकळत घडवत असतो. शिक्षण आणि वारकरी कीर्तन या दोन क्षेत्राचा अवलंब करीत गेल्या वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ व्या वर्षांपर्यंत कार्यरत असणारे पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक या गावचे वै ह.भ.प. मुरलीधर गेणू ढवळेगुरुजी यांनी आयुष्यभर हेच काम केले.आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याचे महत्व आणि गरज अधिक ठळकपणे अधोरेखित व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच ! समाजाला सुशिक्षित व सुसंकृत करणारा 'आधार' म्हणजे शिक्षक आणि कीर्तनकार ! पोलादपूर तालुक्यातील जणू पितामह असलेल्या गुरुजींनी असिधाराव्रत म्हणून या दोन्ही प्रांतातील भूमिका देह ठेवेपर्यंत निष्ठेने केल्या. शिक्षण देणे...