पोस्ट्स

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी वृत्तपत्र लेखन महत्त्वाचे - ना. मंगलप्रभात लोढा

इमेज
  वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ मुंबई : (रवींद्र मालुसरे)  -   सोशल मीडियावरील सामाजिक पत्रकारितेच्या वाढत्या प्रसारामुळे , ‘ वर्तमानपत्रांतील वाचकांची पत्रे’ हा स्तंभ यापुढे दुबळा होत जाईल अशी भीती वाटत असली तरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच सत्ताधारी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी संपादकीय पानावरील त्यांची हक्काची जागा अबाधित राहणे गरजेचे आहे. बोधकथेतील लहानशी चिमणी आपल्या चोचीत पाणी आणून   जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करते ,  याची इतिहासाने नोंद घेतली आहे असेच तुम्ही करीत आहात. त्यामुळे तुम्ही आणि प्रिंट मीडियाने दर्पणपासून सुरू झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत राज्याचे मंत्री ना मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. दादर येथील काणे उपाहारगृहाच्या सभागृहात वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. या वेळी व्यासपीठावर संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे ,  उद्योजक सुरेशराव कदम ,  कामगार नेते दिवाकर दळवी ,  सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मणिशंकर कवठे ,...

महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे

इमेज
महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे   [  यंदा आपण आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करीत आहोत. अत्रे हे खरे तर चालती बोलती सरस्वतीच ! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका वेगळ्या शैलीने सुंदर केली. आपल्या महाराष्ट्रीय नव्या पिढीला आंदोलनांचा जो वारसा लाभला, तो बहुअंगी दमदार नवी दृष्टी देणारा आहे. आचार्य अत्रे अशा थोर सेवकांपैकी एक. झेंडूची फुले हे उत्तम मराठी विडंबन कवितांजली लिहिली, कर्मकांडाचे स्तोम माजवणाऱ्यांची पंचाईत करणारे साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा सारखे नाटक लिहिले. मराठातील अग्रलेख गाजले, पत्रकार म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळीत लोकजागृती यशस्वीपणे केली. श्यामची आई द्वारे साने गुरुजींना घराघरात पोहोचविले. महात्मा फुले हा विलक्षण चित्रपट निर्माण करून तो काळ जिवंत करून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईचें कार्य सर्वांना निकोप रीतीने समजावले. वस्त्रहरण करून दांभिक नेत्यांवर सडेतोड टीका केली. नंतर त्यांच्यावर त्यांनी हृदयस्पर्शी विस्तृत मृत्यूलेखमालाही लिहिल्या. चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्त...

लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने

इमेज
  लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा  -  डॉ तात्याराव लहाने प्रभादेवीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न   मुंबई : (रवींद्र मालुसरे ) -   आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर ,  तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत.   आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणक ,  मोबाईल ,  टॅब ,  आयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतर ,  लगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते. दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल...

संघर्षयोद्धा कॉम्रेड मणिशंकर कवठे

इमेज
  संघर्षयोद्धा कॉम्रेड मणिशंकर कवठे १९५७ सालापासून सतत ९ वेळा म्हणजे एकाच प्रभागातून ४७ वर्षे मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून वरळी कोळीवाड्यातून निवडून येणारे कॉम्रेड मणिशंकर कवठे यांचे नाव आणि कार्य मध्यमुंबईतील नागरिक कायम लक्षात ठेवतील. सुरुवातीला ते लालनिशाण पक्षाचे प्रतिनिधित्व करीत होते. पुढे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लाल निशाण सतत फडकवीत कष्टकरी जनतेचा 'लालबावटा' त्यांनी आमरण हातात घेतला होता. अगदी शिवसेनेच्या लाटेतही ते प्रचंड बहुमताने विजयी होत असत. बालपण - आद्य मुंबईकरांच्या म्हणजे कोळी समाजात वरळी कोळीवाड्यात त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वरळी कोळीवाडा आणि दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यावेळी १९४२ चा चलेजाव आंदोलनाचा लढा सुरू झाला. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.   पिस्तुल हातात घेऊन त्यांनी वरळीच्या पोलिस चौकीवर हल्ला केला होता, त्यात एक गोरा साहेब मृत्युमुखी पडला होता. पोलिसचौकी जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत ...

पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा विशेषांक

इमेज
 पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा विशेषांक  अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर  जागी होते अस्मिता  अन पेटून उठतो माणूस संघर्षासाठी  तुम्ही म्हणाल प्रश्न संघर्षाने सुटत नाहीत  ठाऊक आहे आम्हाला संघर्ष उध्वस्त करतो  माणसातल्या माणूसपणाला  आमचा संघर्ष नाही माणसाविरुद्ध आमचा संघर्ष आहे माणूसपणासाठी करावाच लागेल संघर्ष आम्हाला  तालुक्याच्या न्याय हक्कासासाठी  या ओळी संपादकीयात छापून १९९८ मध्ये म्हणजे २५ पर्षांपूर्वी 'पोलादपूर अस्मिता' चा विशेषांक प्रकाशित केला होता. पोलादपूरचा समग्र इतिहास सांगणारा हा विशेषांक कोणाला वाचायचा असेल तर तर 9323117704 वर मेसेज पाठवा..... सन १९९८ मध्ये मी सीताराम रेणुसे,सीतारामबुवा कळंबे, ज्ञानेश्वर मोरे, दिवंगत अशोक जंगम, सुनील मोरे-काटेतली (बडोदा), मुजुमले गुरुजी, प्रकाश कदम, ज्ञानोबा ला कळंबे या माझ्या सहकार्यांना सोबत घेत "पोलादपूर तालुका विशेषांक" प्रकाशित केला होता,  त्यांनी विशेष मेहनत घेतल्याने हा अंक त्यावेळी प्रकाशित करू शकलो होतो. आता तो अंक दुर्मिळ झाला आहे. अजूनही त्या अंकाबाबत विचारपूर होत असते....

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा - रवींद्र मालुसरे

इमेज
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा ओळखावा  - रवींद्र मालुसरे  मुंबई : (रवींद्र मालुसरे)  महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास पांडुरंगशास्त्री आठवलेले यांनी स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून दिला. यातून ‘योगेश्वर कृषी’, ‘मत्स्यगंधा’ अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला व ते अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. ‘‘ ‘स्व’चा आत्मगौरव करीत परस्पर भेद, द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे,’’‘‘स्व’ला ओळखा, दुसऱ्यांच्या ‘स्व’चा आदर करा, तेजाची पूजा करा, प्रेमभाव जपा, स्वत:ला दुर्बल, शूद्र समजू नका, आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा,’’ असे सांगत स्वाध्याय परिवाराचे हे कार्य दादांनी मराठी एवढेच गुजराती बांधवांमध्ये, तेही आदिवासी, कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजविले. नव्वद टक्क्याहून ज्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले आहेत त्यांनी आपले ध्येय निश्चित करताना हा विचार मनात कायमस्वरूपासाठी रुजवला पाहिजे असे उदगार सुप्रसिद्ध...

मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा

इमेज
  ' मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा ' रवींद्र मालुसरे   महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते ,  तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके  सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावर ,  ग्यानबा-तुकारामांच् या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात  विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि ...