ज्ञानपंढरीचा वारकरी – वै. श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे
ज्ञानपंढरीचा वारकरी – वै. संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे जन्मापासून आयुष्याच्या अंतापर्यंत “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन ज्यांनी सार्थ केले असे पोलादपूरचे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे यांचे नुकतेच वैशाख शु. दशमी, शनिवार, दिनांक १८ मे 2024 रोजी देहावसान झाले. आयुष्यभर केलेली ईश्वरआराधना आपल्या चरणी रुजू करण्यासाठी नियती आणि परमेश्वरही इतक्या तातडीने त्यांना वैकुंठात आपल्यापाशी बोलावून घेईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. समाजाचे नेतृत्व करणारे आम्ही काही निवडक त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ठाणे येथील रुग्णालयात श्रीगुरु बाबांच्या भेटीला गेलो असताना, ते आमचे हात हातात घेऊन, नेहमीप्रमाणे अत्यंत आपुलकीने आमच्याशी हितगुज साधू लागले. त्यावेळेस आम्हाला अनपेक्षित अशी निर्वाणीची भाषा श्रीगुरु बाबांच्या श्रीमुखातून येऊ लागली. आता माझे कार्य संपूष्टात आले आहे ...यापुढे गुरुवर्य रघुनाथदादांना मी तुमच्याकडे सोपवतो आहे, यापुढे त्...