"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना
"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना" स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक आठवण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. त्यावेळची घडलेली गोष्ट. साताऱ्याच्या जेलमधला आपला एक सहकारी सर्वात मोठया पदावर बसल्याचा सर्वाधिक आनंद साखर गावच्या स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालूसऱ्यांना झाला. आणि ते तडक मुंबईत दाखल झाले. करीरोडला खोजा चाळीतील नातेवाईकांकडे उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जुन्या मंत्र्यालयाकडे निघाले. सोबत त्याच चाळीतील घाटावरचा वसंत पाटील नावाचा तरुण होता. धोतर, सदरा, फेटा आणि घुंगराची काठी या वेशभूषेत अंबाजीराव मंत्र्यालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर तडक आतमध्ये घुसले...त्यावेळी आजच्या इतकी कडक सुरक्षा बंदोबस्त नसे. पोलीस अडवू लागले तेव्हा बेडर अंबाजीराव मोठया आवाजात म्हणाले, मी यशवंताला भेटायला आलोय. त्याचे हाफीस कुठं आहे ते सांगा. ते पोलीस काहीच ऐकायला तयार नव्हते...इकडे अंबाजीरावांचे दरडावणे चालूच होते. मी साखर गावचा पाटील. सुभेदार तान्हाजीरावांचा वंशज. जाऊन सांगा यशवंतरावाला अंबा...