बाजीराव विठोबा मालुसरे यांची उपविभागप्रमुखपदी निवड
बाजीराव विठोबा मालुसरे यांची उपविभागप्रमुखपदी निवड (मुंबई : रवींद्र मालुसरे) शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी पोलादपूर तालुक्यातील साखर गावचे सुपुत्र बाजीराव विठोबा मालुसरे यांची मुंबईतील दक्षिण मुंबई फोर्ट उपविभागप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. बाजीराव मालुसरे हे यापूर्वी फोर्ट मुंबई येथे शाखाप्रमुख होते तर सध्या हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आणि कोल्हापूर शिरोळ तालुक्याचे संपर्क प्रमुख आहेत. राजकीय,सामाजिक आणि पारमार्थिक अशी समृद्ध परंपरा लाभलेले बाजीराव मालुसरे हे नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्न असून तत्कालीन कुलाबा जिल्हापरिषदेमध्ये कृषी सभापती व पोलादपूर पंचायत समितीचे उपसभापती असलेल्या स्व विठोबा आण्णा मालुसरे यांचे सुपुत्र आहेत. बाजीराव यांचे मोठे बंधू ज्ञानोबा मालुसरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते व त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. सध्या गुरुवर्य गणेशनाथबाबा संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत. तर दुसरे बंधू तानाजी मालुसरे हे डोंबिवली येथ...