पोस्ट्स

प्रभादेवीतील आगरी सेवा संघ

इमेज
 प्रभादेवीतील आगरी सेवा संघ आज प्रभादेवीत आगरी सेवा संघाच्या वतीने वार्षिक कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे, सन २०११ मध्ये वरळी कोळीवाड्याच्या जनता शाळेत अमृत महोत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता. त्यावेळी १२ डिसेंबरला मुंबईतील काही दैनिकातून मी यासंदर्भात लेख लिहून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन मुंबईकरांना ओळख करून दिली होती. यानंतरच्या ११ वर्षात भटचाळ येथे आगरी सेवा संघ चौक, मुरारी घाग मार्ग येथे माजी नगरसेवक मोतीराम तांडेल चौक, खाडा येथे आगरी सेवा संघाचे समाजमंदिराची स्वतःची वास्तू अशी कामे उभी राहिली आहेत. काळाच्या ओघात संस्थेची स्थापना करणारे काही समाजधुरीण ज्यांनी संस्थेला उर्जितावस्था दिली, आर्थिक ताकद दिली, समाजातील सर्व थरात पोहोचवली असे समाजधुरीण काळाच्या पडद्याआड गेले आहेत, काही वयोवृद्ध झाल्याने घरी आहेत मात्र पद्माकर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडची तरुण पिढी सातत्याने कार्यरत आहे. यातूनच कैलास पाटील, संजय भगत, नरेंद्र बांधणकर, कोठेकर, ज्योति जुईकर असे बरेचजण राजकीय क्षेत्रात पुढे जात आहेत. गुणवत्ता असलेले अनेक तरुण वैद्यकीय क्षेत्रासह आधुन...

माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे - आप्पा परब

इमेज
माणसाने नुसतेच जगू नये,  जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब  डोंबिवली : (रवींद्र मालुसरे) कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे वादळ कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी स्त्री शक्तीची ताकद दाखवून शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्गसंशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांनी रविवारी डोंबिवलीत केले. परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले कलामंदिरात पार पडलेल्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात आप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्काराने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस्ते गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी मान्यवरांचे लेख असलेली डायरीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी परबांच्या पत्नी अनुराधा, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्...

गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

इमेज
  गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब   परब                              -  रवींद्र मालुसरे ( अध्यक्ष ,  मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) आप्पा परब .....  एक सामान्य गिरणी कामगार ,  दादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तके ,  दिवाळी अंक ,  नियतकालिके विकणारे विक्रेते ,  प्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ  ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.   शिवछत्रपतींना दैवत मानणार्‍या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूक ,  त्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी ...

'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन

इमेज
   'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन                                                                             कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी                      भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला लहानपणापासून परिस्थितीचे चटके करीत प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जात ,  प्रसंगी उपाशी पोटी ,  फुटपाथवर रात्र काढली पण वाम मार्ग न धरता ,  सन्मार्गावर चालत राहिलेल्या संदिप शंकर कळंबे यांच्या   ' भुकेचा सोहळा '   या गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य आणि मराठी अभिनेत्री मेघा विश्वास यांच्या करण्यात आले. स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने दरमहा होणाऱ्या  ' मराठी आठव दिवस '  या उपक्रमात अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन क...

शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

इमेज
  शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ? ◆ महेश सावंत कोण ? २१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याच...

वृत्तपत्र लेखकांनी पेनाची निब बोथट होऊ न देता निर्भीडपणे लिहावे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

इमेज
 मातोश्रीवर नवशक्तिच्या जमका चळवळीच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबियांना पत्रकारितेच्या सोबत कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहिता ती लेखणीची धार कधीही बोथट होऊ देऊ नका. बाळासाहेबांचे व्यंगचित्रांचे 'फटकारे' नावाचे पुस्तक आहे, त्यावर फटका मारणारा वाघाचा पंजा आहे. वृत्तपत्र लेखक सुद्धा समाजातले व्यंग शोधून बोचकारत असतो, साहजिकच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी जसे राजकारणी दुखावतात तसे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांनीही आम्ही राजकारणी आणि प्रशासन घायाळ होतो.  परंतु त्याला एक अर्थ आहे. जे पटत नाही ते निस्पृहपणे आणि निर्भीडपणे जाहीररीत्या सांगणे हे तुमचे महत्वाचे काम आहे ते तुम्ही 'कर नाही त्याला डर कशाला' या भावनेने लिहीत राहा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वृत्तपत...