पोस्ट्स

'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन

इमेज
   'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन                                                                             कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी                      भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला लहानपणापासून परिस्थितीचे चटके करीत प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जात ,  प्रसंगी उपाशी पोटी ,  फुटपाथवर रात्र काढली पण वाम मार्ग न धरता ,  सन्मार्गावर चालत राहिलेल्या संदिप शंकर कळंबे यांच्या   ' भुकेचा सोहळा '   या गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य आणि मराठी अभिनेत्री मेघा विश्वास यांच्या करण्यात आले. स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने दरमहा होणाऱ्या  ' मराठी आठव दिवस '  या उपक्रमात अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन क...

शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

इमेज
  शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ? ◆ महेश सावंत कोण ? २१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याच...

वृत्तपत्र लेखकांनी पेनाची निब बोथट होऊ न देता निर्भीडपणे लिहावे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

इमेज
 मातोश्रीवर नवशक्तिच्या जमका चळवळीच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबियांना पत्रकारितेच्या सोबत कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहिता ती लेखणीची धार कधीही बोथट होऊ देऊ नका. बाळासाहेबांचे व्यंगचित्रांचे 'फटकारे' नावाचे पुस्तक आहे, त्यावर फटका मारणारा वाघाचा पंजा आहे. वृत्तपत्र लेखक सुद्धा समाजातले व्यंग शोधून बोचकारत असतो, साहजिकच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी जसे राजकारणी दुखावतात तसे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांनीही आम्ही राजकारणी आणि प्रशासन घायाळ होतो.  परंतु त्याला एक अर्थ आहे. जे पटत नाही ते निस्पृहपणे आणि निर्भीडपणे जाहीररीत्या सांगणे हे तुमचे महत्वाचे काम आहे ते तुम्ही 'कर नाही त्याला डर कशाला' या भावनेने लिहीत राहा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वृत्तपत...

'मार्मिक' सुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध

इमेज
  ' मार्मिक '  सुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे  काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध  -  ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई (  रवींद्र मालुसरे) बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या तथाकथित भक्तीचे नाटकी प्रदर्शन करणाऱ्या भाजपने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे टीमने ,  उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे ठरवले आहे. तरी या दोन गोष्टींत अर्थातच विसंगती आहे ! मात्र एका गोष्टीकडे मुद्दामहून लक्ष वेधायचे आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना आवडला नसता ,  असे सांगितले जात आहे. परंतु फडणवीस सरकारात शिवसेनेच्या मंत्र्यांना काडीची किंमत नव्हती आणि म्हणून त्यांनी राजीनामे खिशात ठेवले होते. बाळासाहेब जर त्यावेळी हयात असते ,  तर त्यांनी  ' कमळाबाई ' ला शेलक्या शब्दांत सुनावून ,  आपल्या मावळ्यांना सरकारबाहेर पडण्याचा त्यावेळी सल्ला दिला असता. असे सद्यस्थितीच्या घटनेची मीमांसा ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी दादर येथे केली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्...

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
  श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराजांचा सत्कार मुंबई : (रवींद्र मालुसरे ) आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू आणि ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगे महाराजांना मानपत्र प्रदान करण्यात आले....

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता

इमेज
  स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता  कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे होते. त्या दिवशी बातमी घेऊन येणारी सकाळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक होती.  सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला , मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा माणिकरावांच्या रूपाने लोकनेता हरपला होता. व्यक्तिगत पातळीवर माझे संबंध अतिशय जवळचे होते.  काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला होता. त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकीय क्षेत्रातील  कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले , देश , राज्य , कोकण एका स्वच्छ , पारदर्शी आणि उच्चशिक्षित राजकारण्यास मुकला आहे. तरूण , निष्ठावंत , प्रचंड क्षमता असलेले आणि जबरदस्त उमदे नेतृत्व त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले.  अत्यंत कमी वयात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली होती.  काँग्रेसचे युवा नेते , माजी आमदार माणिकरावांच्या निधनानं महाराष्ट्रानं , देशानं एक अभ्यासू , कार्यकुशल , नेतृत्व गमावले आहे. जनसामान्यांशी एकरूप असलेला , विकासासाठी झटणारा लोकनेता हर...

भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते

इमेज
  भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते                                                                                                                               - डॉ पी एस रामाणी मुंबई : मनुष्याचे जीवन सुखदुःखानी भरलेले आहे. यातून कोणीही सुटू शकत नाही. सुख तर प्रत्येकाला प्रिय असते. परंतु दुःखाचे चटके मात्र कोणालाच नको असतात. अशावेळी सर्वसामान्य माणूस दुःखाने निराश होतो. जगाशी भांडणे उकरून काढतो. ईश्वराला दोष देतो. येथेच गीतेची शिकवण उपयोगात येते. जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखाचा स्वीकार करण्यास गीता सांगते आणि ते दुःख समर्थपणे पचविण्याचा उपायही शिकवते. श्रीमद भगवद्गगीता जितकी वाचावी तितकी ती वेगवेगळ्या पद्धतीने समजून येत राहते. त्या...