पोस्ट्स

*आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन !*

इमेज
  *आचार्य  अत्रे  यांच्या  स्मृतींना  मुंबईत अभिवादन !*   संयुक्त  महाराष्ट्र  चळवळीचे  अध्वर्यू, महाराष्ट्राचे  अष्टपैलू  व्यक्तीमत्त्व, दै मराठा चे संपादक, साहित्यसम्राट *आचार्य  प्रल्हाद  केशव  अत्रे  यांच्या ५३ व्या  स्मृतीदिनानिमित्त  विनम्र  अभिवादन !  आज सकाळी १० वा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने वरळीनाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा सौ आरती पुरंदरे-सदावर्ते, कार्याध्यक्ष विसुभाऊ बापट, उपाध्यक्ष ऍड अक्षय पै,  रवींद्र मालुसरे,   रवींद्र आवटी, अमर तेंडुलकर उपस्थित होते.

सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे

इमेज
  सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे मुंबई : पोलादपूर तालुक्याला सुभेदार वामन बांदल यांचा अभिमान वाटावा अशी त्यांची भारतीय सैन्यातील त्यांची शौर्याची वाटचाल आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर शिपाई, मग लान्स नाईक, त्यानंतर नाईक, हवालदार, नाईक सुभेदार, ते सुभेदार अश्या वेगवेगळ्या पोस्टवर प्रमोशन घेतल्यानंतर एन एस जी म्हणजे ब्लॅक कमांडो, त्यांच्या या उत्तम कामगिरीची दखल घेत त्यांची ज्युनिअर कमिशनड ऑफिसर अधिकारी या पदावर काम केल्यानंतर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. खरंतर प्रत्येक पोलादपूर वासीयांच्या हृदयात कोरली जायला हवी अशी ही कामगिरी आहे. असे उदगार सुभेदार नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव मालुसरे यांनी काढले. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आला. सुभेदार वामनराव बांदल यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते. बाजीराव मालुसरे पुढे असेही म्हणाले की, अभूतपूर्व साहस, ज...

खाकी वर्दीतील दिलीप जाधव यांच्या माणुसकीचे मनोज्ञ दर्शन

इमेज
महाड : पोलिस वा ‘खाकी वर्दी' म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं . खाकी वर्दीतील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम सध्या ठाणे येथे राहणारे परंतु मूळचे महाड तालुक्यातील किंजळोली - भालेकर कोंड या गावातील निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव जाधव यांनी केले आहे. माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील रिंगेवाडी येथे घडली आहे. २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये साखर गावातील सुतारवाडीवर दरड कोसळली, त्यात संपूर्ण वाडी उध्वस्त होताना ६ मृत्यू तर अनेकजण जखमी झाले हो...

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

इमेज
शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया  (रवींद्र मालुसरे )किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान आणि वीरता अ...

कर्मे इशु भजावा

इमेज
  कर्मे इशु भजावा  अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो. त्याचप्रमाणे  विविध गुणांनी, विविध अभिव्यक्तीनी आणि वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत साहे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल पोलादपूर तालुक्यातील लहुळसे गावात ८० वर्षांपूर्वी ए...

१२७ वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

इमेज
       रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार , व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे. १२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. अस...

चित्रपट अभिनेत्रीची दुनिया

इमेज
  अभिनेत्री सीमा देव चा इंग्रजीचा क्लास ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव गिरगावहून माहीमला राहायला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट. चित्रपटात आहोत म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला यायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी शिकवणी लावायची ठरवली. एक ख्रिश्चन मुलगी त्यांना शिकवण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठीचा  सराव  करून देण्यासाठी  त्यांच्या घरी येऊ लागली. परंतु शूटिंगच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसे. ती मुलगी दररोज येऊन जात असे . परंतु झाले मात्र असे सीमा देव याना इंग्रजीचा सराव  देणे राहिले बाजूला ती मुलगीच छानपैकी मराठीचा सराव करून गेली.   झीनत अमानची ' मोलकरीण ' झीनत अमानला एकदा तिच्या घरी कपडे धुण्यासाठी एका मोलकरीणीची गरज होती. ही बातमी ऐकून एक जण तिच्याकडे आली.  झीनतने तिची इंटरव्हियू घ्यायला सुरुवात केली. तिला प्रश्न विचारला , यापूर्वी तू कोठे नोकरी करत होतीस ? ती म्हणाली ...राखी गुलजार कडे झीनत म्हणाली ,' मग ती नोकरी सोडून माझ्याकडे नोकरी का करावीशी वाटतेय तुला ? राखीपेक्षा मी अधिक लोकप्रिय आहे म्हणून का ? नाही मॅडम , मग माझ्याकडे नोकरी का...