शिवराज्याभिषेक हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनेरी क्षण - दुर्गमहर्षी आप्पा परब
शिवराज्याभिषेक हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनेरी क्षण - दुर्गमहर्षी आप्पा परब मुंबई ( रवींद्र मालुसरे ) - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगड किल्ल्यावर झाला . शिवराजाभिषेकदिनोत्सव सेवा समिती - दुर्गराज रायगड यांच्या वतीने हिंदुस्थानच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण भव्य सोहळ्याच्या स्वरूपात गेली काही वर्षे साजरा करण्यात येतो . केवळ मोगल साम्राज्याविरुद्धचा राजकीय एल्गारच नव्हे , तर मराठा संस्कृती आणि मराठ्यांच्या यशस्वी प्रतिकारतेचा हा सोहळा होता . शिवरायांच्या प्रति असलेला अभिमान आणि स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर नवोदित पिढीकडून करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न कौुकास्पद आहे असे गौरोवोद्गार दुर्गमहर्षी आप्पा परब यांनी काढले . श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती - दुर्गराज रायगड यांच्या वतीने जागर शिवराजाभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्य सावरकर स्मारकात आयोजित करण्यात...