पोस्ट्स

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।। https://youtu.be/xEOpbg0rnRw

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।।   https://youtu.be/xEOpbg0rnRw

'ताठ कणा' मूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे

इमेज
  ' ताठ कणा '  मूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे मुंबई (रवींद्र मालुसरे) :   जगभरातली आई आपल्या प्रत्येक मुलाला लहानपणी हेच शिकवते की ,  आयुष्यभर ताठ कण्याने जगत रहा. डॉ. प्रेमानंद म्हणजे पी एस रामाणी यांच्या आईने सुद्धा त्यांच्यावर तसेच संस्कार केले. त्यामुळे कुणासमोरही वाकायचं ,  झुकयाचं किंवा माघारही घ्यायची नाही हे अंगीकारल्याने जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरो स्पायनल फ्लिप सर्जन म्हणून प्रसिद्ध होऊ शकले असे गौरवपूर्ण उदगार मन:शक्ती केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी दादर येथे काढले. डॉ रामाणींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व शिष्यांच्या वतीने त्यांना नुकताच 'गुरु द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करून गौरविले होते. याचे औचित्य साधून शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा व प्रतिमा रामाणी यांचा विशेष सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमोद शिंदे पुढे असेही म्हणाले की ,  मनशक्ती केंद्रात लहान मुलांना शिकवताना आम्ही विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती ...

मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे

इमेज
  मराठी केवळ भाषा नव्हे , आपला प्राण आहे -  डॉ पी एस रामाणी मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे , आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी , वाक्प्रचार , अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या.  मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी , ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे  मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई , दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही  म्हणाले की , मराठी प्रेम एक दिवसापर्यंत मर्यादित नसून , यापुढे  प्रत्येक दिवस मराठी म्हणून जगूया. मराठी भाषेवरचे आक्रमण सहन...

दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !

इमेज
 दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली ! नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसं भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचऊ धोरण अवलंबविणाऱ्या माणसांचा गजबजाट आज सभोवती दिसतो आहे. आयुष्याच्या प्रवासात ऐन उमेदीच्या काळात कोणीतरी भेटावे आणि त्याच्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे मैत्रीच्या रुपात कौटुंबीक ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे दिवंगत शरद वर्तक साहेब नकळत माझ्या आयुष्यात आले आणि ३७ वर्षे कायम मुक्कामाला राहिले. त्या राहण्यात त्यांच्या सौ वर्तकांचे घरच्या माणसाचे आपलेपण तर शरदरावांचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचे नाते होते. वर्तक जेवढे साधे दिसत तेवढेच ते साधेपणाने बोलत परंतु निर्भीड आणि परखडपणे संपादकीय पानावर लिहीत असत. वर्तक साहेबांची आणि माझी भेट १९८६ ला शिंदेवाडीच्या संस्थेच्या कार्यालयात झाली. पुढे दर शनिवारी आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट होत गेली. काही माणसे अनेक चेहऱ्यांनी समाजात वावरत असतात. शरद वर्तकांना दुसरा चेहरा नव्हताच, एकच होता. सार्वजनिक  जीवनात वावरताना आज मी थोडीफार श्रीम...

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

इमेज
  पत्रकार आणि ममता दिनानिमित्त ' ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा ' या विषयावर मुक्तचर्चा मुंबई (रवींद्र मालुसरे) :   घर आणि आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते . नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन : स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांना असल्याने त्यांनी खोपोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त जागेत थ्री स्टारला साजेसा रमाधाम वृद्धाश्रम सुरु केला . वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर व त्याठिकाणी वृद्धांची अन्न , वस्त्र , निवारा , व औषधोपचार यांची सोय करणे व त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा वसा त्यांच्या पश्च्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व रमाधामचे विश्वस्त अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी सामाजिक सेवेचे त्यांचे व्रत पुढे सुरु ठेवले आहे . समाजातल्या गरजूंनी या वृद्धाश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणच्या सुखसोयी आणि व्यवस्था पाह...