मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे
मराठी केवळ भाषा नव्हे , आपला प्राण आहे - डॉ पी एस रामाणी मुंबई : मराठी केवळ भाषा नव्हे , आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी , वाक्प्रचार , अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या. मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी , ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई , दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही म्हणाले की , मराठी प्रेम एक दिवसापर्यंत मर्यादित नसून , यापुढे प्रत्येक दिवस मराठी म्हणून जगूया. मराठी भाषेवरचे आक्रमण सहन...