पाय गमावलेल्या उदयोन्मुख तरुण खेळाडू "साक्षी दाभेकरचा टाहो" मला मैदानात उतरायचे आहे !
पाय गमावलेल्या उदयोन्मुख तरुण खेळाडू 'साक्षी दाभेकरचा' टाहो मला मैदानात उतरायचे आहे ! - रवींद्र मालुसरे अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई दरवर्षी जुलै महिन्यातला पाऊस मन विषण्ण करणाऱ्या जखमा देऊन जातो. यंदा २२ जुलैला बरसलेल्या आस्मानी संकटानं निसर्गानं नटलेल्या कोकणावर वक्रदृष्टी केली आणि हा हा म्हणता होत्याचं नव्हतं झालं. महाड, पोलादपूर, चिपळूण, रत्नागिरी अशा बऱ्याच ठिकाणी मृत्यूनं थैमान घातलं. कित्येकांना आपल्यासोबत नेलं, तर त्यातून बचावलेल्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. धो-धो पडणाऱ्या पावसामुळं आलेल्या या महापूरात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात डोंगराळ भागात वसलेल्या केवनाळे गावातील १४ वर्षांच्या कुमारी साक्षी नारायण दाभेकर या उदयोन्मुख खेळाडूची स्वप्नंच वाहून गेली आहेत. केवनाळे गाव दरड कोसळली पोलादपूर तालुक्यातील सावित्री खोऱ्यात केवनाळे गाव गेल्या अनेक शतकांपासून अतिदुर्गम डोंगरात वसलेले आहे, परवाच्या दुर्घटनेत ५ माणसे मृत्युमुखी पडल्याने महाराष्ट्रभर चर्चेत आले आहे. आंबेनळी घाट ते सावित्री नदीच्या दरम्यानच्या प्रदेशात हा गाव...