पोस्ट्स

व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे

इमेज
  व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे एका मांजरीला ९ वेळा जन्म मिळतो. असे म्हटले जाते. हे खरे आहे की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या एका मित्राच्या बाबतीत त्याच्या २९ वर्षांपूर्वीच्या आयुष्याचा पट ऐकल्यानंतर हे खरे आहे की, त्याला २ वेळेस जन्म मिळाला. पहिल्यांदा नैसर्गिक आयुष्य मिळाले. म्हणजे जेंव्हा त्यांच्या आईने जन्म दिला. आणि दुसरा जन्म बायकोमुळे 'क्रिपा व्यसनमुक्ती' केंद्र येथे मिळाला. जेथे त्यांचे चांगल्या निर्व्यसनी मनुष्यामध्ये रुपांतर झाले. फक्त बोलण्यापुरते नाही तर त्याच्या वागण्यात आणि एकंदर व्यक्तीमत्वामध्ये त्यानंतर खुप फरक पडला. याच केंद्रामध्ये तो परत परत चांगला विचार करायला व वागायला शिकला. आणि समाजातला उपयुक्त असा नागरिक बनला. रमेश भिकाजी सांगळे हा युवक शालांत परीक्षा पास होऊन, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड पवई येथे १५ सप्टेंबर १९७७ साली शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला. आणि प्रशिक्षण पूर्ण करून १३ डिसेंबर १९८१ साली कामगार म्हणून कायम झाला. कंपनीच्या सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदा बिअरचा ग्लास उचलून त्याने स्वताच्या ओठाशी लावला. जिभेवर रेंगाळलेल्या याच पहिल्या घोटाने पुढ...

छत्रपती शिवाजीराजे भोसले

इमेज
(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०)  छत्रपती शिवाजीराजे हे  मराठा साम्राज्याचे  संस्थापक होते. “आम्ही पूर्ण जग फिरलो. त्यातील भारत हा मुलुख आम्ही जिंकलाच कसा यावर आज विश्वास बसत नाही. शिवाजीसारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर ही पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे निर्माण झाले असते” असे लॉर्ड एल्फिस्टन यांनी तर इंग्लंडचे ग्रँड डफ यांनी “राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. हतबल झालेल्या बहुजनांना त्यांच्या चाणाक्ष योजनेमुळे सत्ताधीश होता आले.”   ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केले त्यांच्या दोन अधिकाऱ्यांचे हे विचार त्यांनी जागतिक इतिहासात कायमचे कोरून ठेवले आहेत…………………. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नीतिवं...

सार्वजनिक गणेशोत्सव

इमेज
सार्वजनिक गणेशोत्सव आनंदाची पर्वणी अन् जल्लोषाचा साज . उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे , भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती तर उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे . श्रावण - भाद्रपद - अश्विन - कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते . गणपती हे प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे . मूलतः हि आर्येतर देवता . वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली . आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली . ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला . त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे . प्रत्येक मंगल कार्याच्या शुभ प्रसंगी त्याचे आवाहन करण्याची तसेच त्याचे प्रथम पूजन केले जाते . श्रीगणेशाची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील...