१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वकीयांच्या पारंतंत्र्यात स्वातंत्र्यदिन म्हणजे देशभक्ती .... तिरंगा ध्वज आणि मातृभूमीच्या विषयी अभिमान व्यक्त करण्याचा दिवस . विसाव्या शतकात आपल्या देशाने गुलामीविरुध्द लढा दिला . ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला . साता समुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले . युनियन जॅक फडकावत ठेवला आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो . आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली . मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला ? दीडशे वर्षे राज्य कसे केले ? तर भारतातील कमकुवत राजसत्तांचा , विखुरलेल्या राज्यांचा , संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी , फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा घेत फोडा आणि झोडा याचा अवलंब करीत इंग्रजांनी सारा देश पादाक्रांत केला . आपल्या देशातील संपत्ती त्यांच्या देशात घेऊन गेले इंग्लंडला संपन्न केले व आपल्या देशाला...