पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा || गुरुवंदन ||
पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा || गुरुवंदन || पोलादपूर तालुका हा खरं तर वारकऱ्यांचा तालुका. वै गुरुवर्य ह भ प हबाजीबाबा, वै गुरुवर्य ह भ प हनवतीबुवा, वै गुरुवर्य ह भ प मारुतीबाबा मोरे, वै गुरुवर्य ह भ प गणेशनाथ महाराज, वै गुरुवर्य ह भ प रामचंद्र आ ढवळेबाबा, वै गुरुवर्य ह भ प नारायणदादा घाडगे, वै गुरुवर्य ह भ प श्रीपततात्या, वै गुरुवर्य ह भ प मोरे माऊली अशी वारकरी सांप्रदायातली थोर परंपरा तालुक्याला लाभली आहे. वर उल्लेखिलेल्या श्रीगुरूंनी डोंगराळ भागात परमार्थ करताना आणि तो वाडीवस्तीवर रुजवताना निस्वार्थीपणे देवाची करुणा भाकली. ज्ञानदीप लावू जागी या उक्ती सार्थ करण्यासाठी अहोरात्र शरीर झिजवले. त्यामुळेच पोलादपूर तालुक्याला वारकऱ्यांचा तालुका अशी ओळख संपूर्ण महाराष्ष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यांची पुढची पिढी सध्या हा वारसा चालवत आहे. त्यांनी तो विना अहंकार समर्थपणे चालवावा अशी प्रांजळ मागणी फक्त देवाकडे करू शकतो. खरा गुरु शिष्याला परिपूर्णतेने घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अर्थार्जनाची, नावलौकिकाची अपेक्षा न...