पत्रकार आणि ममता दिनानिमित्त 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा
पत्रकार आणि ममता दिनानिमित्त ' ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा ' या विषयावर मुक्तचर्चा मुंबई (रवींद्र मालुसरे) : घर आणि आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते . नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन : स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांना असल्याने त्यांनी खोपोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त जागेत थ्री स्टारला साजेसा रमाधाम वृद्धाश्रम सुरु केला . वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर व त्याठिकाणी वृद्धांची अन्न , वस्त्र , निवारा , व औषधोपचार यांची सोय करणे व त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा वसा त्यांच्या पश्च्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व रमाधामचे विश्वस्त अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी सामाजिक सेवेचे त्यांचे व्रत पुढे सुरु ठेवले आहे . समाजातल्या गरजूंनी या वृद्धाश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणच्या सुखसोयी आणि व्यवस्था पाह...