ABOUT ME


मी रवींद्र मालुसरे.... पोलादपूर अस्मिता पाक्षिक आणि सांग सखी या वेबपोर्टलचा मुख्य संपादक. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेचा विद्यमान अध्यक्ष, यापूर्वीही  दोन वेळा हे पद भूषविले आहे, मुंबई-पुणे-कोकणातल्या अनेक दैनिकातून सातत्याने लेखन, साई सहवास, अष्टमुद्रा दिपप्रभात या दिवाळी अंकाचे संपादक, पोलादपूर अस्मिता या अनियतकालिकाचे आणि वाचकांची चळवळ या वार्षिकाचे संपादक. मुंबईतील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय घडामोडींचा गेल्या तीन तपांचा साक्षीदार. माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत त्या "सांग सखी" वेबपोर्टल च्या  माध्यमातून युनिकोड चा वापर करीत सत्यात उतरवायच्या आहेत,अनुभव व्यक्त करण्याकरिता यापुढे लेखणी बरोबरच की-बोर्डचा पुरेपूर वापर करणार आहे. वाचन, गप्पा, चर्चा, विचार, विनोद,लेखन, क्रिकेट, राजकारण,वारकरी साहित्य, मराठी अस्मिता, शिवछत्रपतींचा इतिहास....आणि बरेच काही जिव्हाळ्याचे, अभ्यासाचे आणि आवडीचे विषय. पूर्ण वेळ भारतीय, सामाजिक विषमता मिटवण्याचे स्वप्न. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...