पोस्ट्स

आगरी-कोळ्यांची माटुंगा येथील श्रीमारुबाईचे जागृत देवस्थान

इमेज
आगरी-कोळ्यांची माटुंगा येथील  श्री मारुबाई चे जागृत देवस्थान आताचे मुंबई आणि पूर्वीचे बॉम्बे हे शहर मुळात अरबी समुद्रातील सात बेटे जोडून तयार झाले आहे. त्या बेटांमध्ये कुलाबा , ओल्ड वूमन आयलंड , बॉम्बे , माझगाव , वरळी , माहिम , माटुंगा यांचा समावेश होता. सात बेटांच्या मुंबापुरीचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी , आगरी , भंडारी , पाचकळशी या समाजाचे लोक होते. तीनशे वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व गावे ब्रिटिशांनी ताब्यात घेतली. यापैकी बहुतांश बेटांना त्यावेळी त्यांची ग्रामदेवता होती. गावातील लोकांचे ती रक्षण करते अशी तेथील गावकऱ्यांची श्रद्धा होती. माटुंगा बेटावरील गावकऱ्यांची  श्री मारुबाई   ही ग्रामदेवता होती. माटुंगा बेट हे तेव्हा आताच्या परळपासून ते शीवपर्यंत विस्तारलेले होते. शीव ही पूर्वीच्या मुंबईची उत्तर सीमा होती. मराठीमध्ये सीमा , हद्दीला शीव म्हणत असल्याने तेच नाव या भागाला पडले. माटुंगा बेटावर प्रामुख्याने कोळी-आगरी , भंडारी लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. माटुंग्याला फार पूर्वी    श्री मारुबाई    टेकडी गाव   असेही म्हटले जायचे. कालांतराने या नावाचे माटुंगा हे लघुरूप प्रचलित झाले. का

पत्रकार नितीन चव्हाण : एक झुंज संपली….

इमेज
  पत्रकार नितीन चव्हाण :  एक झुंज संपली….   बडी लंबी सांसे लेता हूँ आज कल घबरता हूँ , कई टूट न जाये यह माला इनमे से कुछ बचाना चाहता हूँ बिटिया के चेहरे पे भगवान देखने के लिये थोडी एव्हरेस्ट के नन्ही चोटी के लिये  ही पोस्ट नितीनच्या व्हाट्सअँप स्टेटसला त्याने काही दिवस मृत्युपूर्वी ठेवली होती. या कवितेतून व्यक्त झालेला विचार , त्याच्या जीवाची चाललेली घालमेल मी २०१८ पासून दिवसेंदिवस त्याच्या तोंडून ऐकत होतो अन पाहातही  होतो. अखेर आज सकाळी ५-३५ ला मोबाईल वाजला अन त्याच्या मुलीचा वैष्णवीचा त्याच्या लाडक्या बाबुष्टयाचा आवाज आला. हुंदके देत म्हणत होती , काका ...पप्पा सकाळी ३-३० वाजता ऑफ झाले... आम्ही लगेच गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण पप्पांना नाही वाचवू शकलो..... शब्द ऐकल्यानंतर मी सुन्न झालो होतो , मोबाईलमधून लेकीचे फक्त हुंदके ऐकायला येत होते..... थोड्या वेळाने बृहन्मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष पत्रकार मारुती मोरे आणि महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार आणि नितीन व माझे समान मित्र रमेश सांगळे यांना घडलेली बातमी सांगितली. अन थोड्या वेळासाठी अंथरुणावर